आपण रोज वापरत असलेल्या अन्न-पाणी, सौंदर्यप्रसाधने आणि स्वयंपाकघरातून हळूहळू 'आजार' आपल्या 'शरीरात' प्रवेश करत आहेत का?
प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न – माझ्या कुटुंबाला हळूहळू वाढणाऱ्या आजारांच्या विळख्यातून सुरक्षित कसं ठेवायचं?
आज बहुतेक आजार अचानक होत नाहीत.
ते हळूहळू तयार होतात — आपल्या रोजच्या अन्नातून, पाण्यातून,
स्वयंपाकघरातील साधनांतून आणि आपण वापरत असलेल्या सौंदर्यप्रसाधनांमधून.
आज आपण जे खातो, जे पितो आणि ज्या वस्तू रोज हाताळतो, त्यामधील रसायनांचा, प्रक्रिया केलेल्या घटकांचा आणि नैसर्गिकतेपासून दूर गेलेल्या सवयींचा शरीरावर हळूहळू पण खोल परिणाम होत असतो.
प्रति,
भारतीय सुजाण नागरिक, यांसी
विषय- आपल्या गावातील नागरिक, माता, भगिनींच्या आणि लहान मुलामुलींच्या सर्वांगीण आरोग्यासाठी “स्वयंपाकघर, अन्न-पाणी आणि सौंदर्यप्रसाधनांतील विषाक्तता समजून घेणे ज्यामुळे भयंकर आजार जडलेले आहेत तसेच नैसर्गिक अन्नाची उपलब्धता, विषमुक्त शेती निर्मिती, आणि भविष्यातील रोजगाराच्या वाटा” या विषयी व्यवस्था / कार्यशाळा / सेमिनार अर्थात कृतिकार्यक्रमात सहभागी होणे बाबत.
आपणांस सस्नेह प्रणाम! मी श्री. संतोष मार्के (Natural Food and Wellness Practitioner, संस्थापक: संवृद्ध भारत परिवार, किचन कायनेटिक्स, NLP and Digital Coach) एक भारतीय सुजाण नागरिक, माझी कर्तव्य परायणता म्हणून उपरोक्त विषयांन्वये आपणांस पत्र लिहिण्यास कारण कि, आजच्या घडीला मानवाला जडलेल्या आजारांची भयंकर परिस्थिती पाहता लहान मुलांपासून ते वरिष्ठांपर्यंत अनेकांना सामान्य आजारांपासून वेगवेगळ्या दुर्धर आजारांनी ग्रासलेले आहे.
मागील ३०-४० वर्षात कृषी क्षेत्रात रसायनांचा अति वापर वाढला. खते, औषधे, कीटकनाशके, रासायनिक तणनाशक, ग्रोथ हार्मोन्सचा वापर सुरु झाला, स्वयंपाकघरात जे-जे बदल झाले त्याचा एकंदरीत परिणाम म्हणून आज सर्वांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यासारखी दिसत आहे. लहान मुलांमध्ये ऑटोइम्यून आजार (Autoimmune Diseases) वाढलेले आहेत, महिल्यांच्या अंडाशयांची (Ovaries) स्थिती अतिशय गंभीर, विपत्तीजनक झालेली आहे. पुरुषांमध्ये सुद्धा शुक्रधातूची कमतरता दिसून येत आहे.
या सर्व गोष्टींचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर अर्थात आपल्या मुलामुलींवर, आपल्या पुढील पिढीवर खूप खोलवर होतो आहे. अभ्यासात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी होणे आणि शिकण्याची क्षमता बाधित होणे यांसारखे मेंदूचे आजार वाढत आहेत. त्याचप्रमाणे, हार्मोनल असंतुलन, ॲलर्जी आणि श्वसनाचे आजारही दिसून येत आहेत. या सर्व कारणांमुळे विद्यार्थ्यांची केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि बौद्धिक वाढही थांबत आहे, ज्यामुळे त्यांच्या शालेय जीवनावर थेट नकारात्मक परिणाम होत आहे.
मी ह्या सर्व गोष्टींचा सूक्ष्मपणे अभ्यास करून मागील १५ वर्षांपासून ह्या क्षेत्रात अविरतपणे कार्य करत आहे. आज देशभरात आजार झाल्यावर शेकडो रिपोर्ट आणि हजारो औषधे उपलब्ध आहेत पण आजार होऊच नयेत आणि झालेच तर सहजरित्या बरे व्हावेत ह्यावर कोणतीही व्यवस्था कार्यरत आहे असे दिसून येत नाही. अशी व्यवस्था आम्ही निर्माण केलेली आहेच आणि ती व्यवस्था कृतिशीलतेत सुद्धा आणलेली आहे. ह्या विषयावर माझे आजवर हजारो व्याख्यान/सेमिनार झालेले आहेत व ऑनलाईन ट्रेनिंग सुद्धा सुरु आहेत.
सर्वांना नैसर्गिक अन्न व सर्वोत्तम आरोग्य लाभावे ह्या दृष्टीने आपल्यासाठी तसेच आपल्या भावीपिढी साठी एक सुखरूप व्यवस्था निर्माण करत आहोत. गावागावांमध्ये नैसर्गिक अन्न पिकविण्यासाठी विषमुक्त शेती व्हावी. प्रत्येक घराघरात नैसर्गिक अन्नाच्या सोबतच नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने, मिष्टान्न उपलब्घ व्हावेत, गावागावात “स्वग्रामी व्यवस्था” निर्माण व्हावी, गावातील लोकांनाच नाही तर शहरातील लोकांना सुद्धा शेतातून, गोसेवेतून, नैसर्गिक अन्नधान्न्यातून, आणि स्वयंपाकघरातून रोजगाराच्या वाटा कशा निर्माण होतील यावर कार्य उभारणी आम्ही सुरु केली आहे. यासाठी आयुर्वेदाचे तज्ञ वैद्य, होमिओपॅथी, नॅच्युरोपॅथी, पंचगव्य, अॅलोपॅथीचे तज्ञ डॉक्टर्स, योगाभ्यास शिक्षक, योगविद्या शिक्षक, मेडिकल एस्ट्रोलॉजी तज्ञ, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, शिक्षक, पर्यावरण तज्ञ, बँकिंग आणि आय टी क्षेत्राचे तज्ञ, वैज्ञानिक, आहार तज्ञ, व्यावसायिक, शेतकरी आणि दैवी कृपेचे सूक्ष्म विज्ञान तज्ञ एकत्रित येऊन कार्यारंभ केलेला आहे.
आपणा सर्व सुजाण नागरिकांना, आपल्या ग्रामस्थांना, माता-भगिनींना तसेच विद्यार्थ्यांना म्हणजेच लहान मुलामुलींना या महत्त्वाच्या विषयाचे ज्ञान मिळाल्यास ते अधिक जागरूक आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली स्वीकारतील, त्यांच्या क्षमतांची योग्य उन्नती साधतील अशी आम्हाला खात्री आहे. आपण एकत्रितपणे येऊन हा महत्वाचा विषय समजून घेऊ तसेच येणाऱ्या संकटांवर दूरदृष्टीपुर्वक संवाद साधून उपाययोजना करून सर्वांना, शेतकऱ्यांना सुद्धा हि स्वावलंबी व्यवस्था निर्माण करण्यासाठी कृती कार्यक्रम आखून देण्याचे प्रयास करू. तरी कृपया, या व्यवस्थेसाठी आपले कर्तव्य म्हणून हि राष्ट्रसेवा एकत्र येऊन निर्माण करूया.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत.ह्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पुढील बटनावर क्लिक करून whatsapp वर संपर्क साधावा. ह्या कार्याचे छायाचित्र कार्यशाळेत दाखवले आहेत तसेच अधिक माहितीसाठी सविस्तरपणे लिहिलेले पुढील पत्र कार्यशाळेत किंवा ऑनलाईन सेमिनार मध्ये दाखविण्यात येईल.
सस्नेह शुभेच्छांसहित!
श्री. संतोष मार्के- WhatsApp no. 95 1878 1656
नमो नमः धन्यवाद!
जय जवान, जय किसान ! जय हिंद!
यद् भावः तद् भवति | ।। शिवम् शिवोहम् ।।
टीप: हे अंतिम सत्य नाही. आम्ही विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करण्याची दिशा दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
कृपया course content externally share करू नका.
